रत्नागिरी : महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करत ह्यरद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, अशी मागणी करत सोमवारी भाजपच्यावतीने महावितरण कार्यालयाबाहेर बिल फाडो आंदोलन करण्यात आले. शासन वीजमाफी करत नाही तोपर्यंत बिलांसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी तंबी भाजप नेत्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. आपल्या भावना शासनाकडे पोहोचवतो, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली.महावितरणच्या नाचणे येथील कार्यालयाबाहेर सकाळी ११.३० वाजता भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच या वेळी भाजपने महावितरणची बिले कार्यालयाबाहेर फाडून टाकली. महाविकास आघाडी सरकार व महावितरणचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून वीजबिलांची होळी केली.भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, राजेश सावंत, सचिन वहाळकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता सायनेकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आम्ही कोणाचीही वीज तोडलेली नाही, असे सायनेकर यांनी सांगितले. लोकांनी भरलेल्या बिलामध्ये शासनाच्या आदेशानुसार सवलत मिळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:25 IST
mahavitran, lightbill, bjp, ratnagirinews महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करत ह्यरद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, अशी मागणी करत सोमवारी भाजपच्यावतीने महावितरण कार्यालयाबाहेर बिल फाडो आंदोलन करण्यात आले. शासन वीजमाफी करत नाही तोपर्यंत बिलांसाठी कर्मचारी पाठवू नका, अशी तंबी भाजप नेत्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. आपल्या भावना शासनाकडे पोहोचवतो, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली.
रद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, वीजबिलांची होळी
ठळक मुद्देरद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, वीजबिलांची होळीजिल्ह्यात भाजपचे महावितरणसमोर आंदोलन