शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:01 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस सोमवारपासून शहरी वाहतूक सुरू, प्रवाशांना दिलासा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून शहरी मार्गावरील वाहतूकही सुरू करण्याचा निर्णय रत्नागिरी विभागाने घेतला आहे.कोरोनामुळे दिनांक २२ मार्चपासून एस्. टी.ची वाहतूक ठप्प होती. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार २० ऑगस्टपासून सामाजिक अंतर राखून आसन क्षमतेच्या ५० टक्केप्रमाणे आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याला राज्य परिवहन महामंडळाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.

कर्नाटक व गुजरात राज्यांनी शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर महाराष्ट्रातही शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. एस्. टी. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे.वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बस या निर्जंतूक करूनच मार्गस्थ करण्यात याव्यात, लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या झेड पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. मात्र, यापुढे पूर्ण आसन क्षमतेने वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याने सर्व आसने पूर्ववत करण्याची सूचना देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातर्फे रविवार, २० सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.रत्नागिरीतील शहरी वाहतूक दिनांक २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनपासून आतापर्यंत शहरी वाहतूक बंद होती. आता शहरी वाहतूक सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी