शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

फाेनवर बाेलता बाेलता काही क्षणात संपवले जीवन, कारण अस्पष्ट; कुटुंबियांना बसला धक्का

By मनोज मुळ्ये | Updated: June 27, 2023 17:39 IST

सचिन माेहिते   देवरुख : फाेनवर बाेलत असताना अचानक आवाज बंद झाल्याने खाेलीत पाहताच वडील नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला ...

सचिन माेहिते  देवरुख : फाेनवर बाेलत असताना अचानक आवाज बंद झाल्याने खाेलीत पाहताच वडील नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शाेध घेतल्यानंतर वडिलांनी घराच्या मागील बाजूला आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. प्रकाश सदाशिव चव्हाण (५४, रा. वांझाेळे-भाेईवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या करणाऱ्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (२५ जून) राेजी रात्री घडला.

या घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा मयूर प्रकाश चव्हाण याने दिली आहे. प्रकाश चव्हाण यांचा देवरूख येथे गेली १५ वर्षे सलून व्यवसाय आहे. मयूर चव्हाण सलून बंद करून घरी आला असता वडील प्रकाश चव्हाण हे रविवारी रात्री जेवत हाेते. त्यानंतर त्यांना फोन आल्याने ते जेवणावरून उठून फाेनवर बाेलत हाेते. मयूर जेवण करून बसला असता काही वेळानंतर अचानकपणे खोलीतून वडिलांच्या बोलण्याचा आवाज येत नसल्याने मयूरने दरवाजा उघडून खोलीत पाहिले. त्यावेळी ते खाेलीत दिसले नाहीत. घराच्या आजूबाजूला पाहिले असता, प्रकाश चव्हाण हे घराच्या मागील बाजूला आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.

याबाबतची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत साडी कापून चव्हाण यांना खाली उतरवले. त्यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. देवरूख ग्रामीण रुग्णालयात प्रकाश चव्हाण यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चव्हाण यांनी का आत्महत्या केली, याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. सोमवारी चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी