शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘विराट’ श्वानाच्या मदतीने अवघ्या ३६ तासात घरफोडी उघड

By अरुण आडिवरेकर | Updated: November 26, 2022 16:47 IST

रत्नागिरी : बंद घर असल्याचा फायदा उठवत चोरट्याने १ लाख ७५ हजार किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना कळंबट (ता. ...

रत्नागिरी : बंद घर असल्याचा फायदा उठवत चोरट्याने १ लाख ७५ हजार किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना कळंबट (ता. चिपळूण) येथे घडली होती. या घरफोडीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी ‘विराट’ या श्वानाची मदत घेतली. घटनास्थळी सापडलेल्या पर्सच्या वासावरुन या श्वानाने १५० मीटर अंतरावर असलेल्या गावातील एका संशयिताला पकडून दिले.याबाबतची फिर्याद सुवर्णा कृष्णा गावडे (४५, रा. कळंबट-फणसवाडी, चिपळूण) यांनी दिली होती. सुवर्णा गावडे यांचे राहते घर १९ नोव्हेंबर सकाळी ११ ते २३ नोव्हेंबर सकाळी ९ या कालावधीत बंद होते. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने घरावरील कौले काढून घरात प्रवेश केला होता. अन् तब्बल १ लाख ७५ हजार किमतीचा ऐवज चोरून नेला.रत्नागिरीपोलिस दलाच्या श्वान पथकातील ‘विराट’ला तपासासाठी घटनास्थळी आणले. त्याठिकाणी मिळालेल्या पर्सचा वास श्वानाला देण्यात आला. या पर्सचा वास घेताच श्वान सुमारे १५० मीटरच्या अंतरावर असलेल्या गावातील वाडीत पोहोचला. या वाडीतीलच एका घराजवळ हा श्वान येऊन थांबला आणि भुंकू लागला. श्वानाच्या इशाऱ्यानंतर तपास पथक घरात चौकशीसाठी शिरले. पोलिस तपासात घरातील व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला सावर्डे पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, सावर्डेचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीपक साळोखे, श्वान पथक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक चित्रा मढवी, सावर्डेच्या पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर, सहायक पोलिस फौजदार प्रदीप गमरे, हवालदार राजेंद्र आरवट, श्वान पथकातील चालक संभाजी घुगरे, श्वान हस्तक महेश हरचिरकर, संदेश कोतवडेकर यांच्यासह सावर्डे पोलिस स्थानकाच्या कर्मचारी यांनी या चोरीचा छडा लावण्याची कामगिरी बजावली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस