शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरकरांवर घरपट्टी करवाढीचा बोजा, नागरिकांमधून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:46 IST

Rajapur Nagar Parishad News- कोविडनंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना राजापूर नगर परिषदेने घरपट्टीत तब्बल २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्याच्या नोटीस बजावल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देराजापूरकरांवर घरपट्टी करवाढीचा बोजा, नागरिकांमधून नाराजीगतवर्षीच नवा कर माथी, नगर परिषदेने बजावली नोटीस

राजापूर : कोविडनंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना राजापूर नगर परिषदेने घरपट्टीत तब्बल २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्याच्या नोटीस बजावल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली गतवर्षीच नवा कर नागरिकांच्या माथी मारलेला असताना यावर्षी वीस टक्क्यांनी मालमत्ता कर वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.नगर विकास खात्याच्या निर्देशानुसार पंचवार्षिक फेरआकारणी करताना राजापूर नगर परिषदेने शहरातील ३ हजार २४५ मालमत्तांचे जुलैअखेर सर्वेक्षण केले होते. ऐन कोविडच्या कालावधीत नगर परिषदेचे सर्वेक्षण सुरू होते. नव्या सर्वेक्षणानंतर नगर परिषदेने शहरातील एकूण मालमत्ता करात १५ लाख रूपयांची वाढ अपेक्षित धरली आहे.नगर विकास विभागाने आरसीसी बांधकामांसाठी २० टक्के, लोड बेअरिंग बांधकामांसाठी १६ टक्के, चिरेबंदी - कौलारू घरांसाठी १४ टक्के व गोठ्यांसाठी १० टक्के दरवाढ करण्याचे प्रशासनाला कळविले आहे. याशिवाय भाडेकरू असल्यास त्याच्या एकूण वार्षिक भाड्यात १० टक्क्यांची वजावट करून उर्वरित रकमेवर ३१ टक्के कर आकारणी केली जाणार आहे.

या करामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात १ कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा होणार आहे. या कर वाढीच्या नोटीस नागरिकांना बजावण्यात आल्या असून, त्यावर नगर विकास विभाग सुनावणी घेणार आहे.हरकती देण्याची सूचनागतवर्षी राजापूर नगर परिषदेने नागरिकांवर १८० रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन कर बसवलेला आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कर ३६० रुपयांचा आहे. त्यानंतर आता मालमत्ता करात २० टक्क्यांहून अधिक दरवाढ केली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यासाठी मुख्याधिकारी यांच्या नावे अर्ज करायचा आहे.

टॅग्स :Rajapur Nagar Parishadराजापूर नगर परिषदRatnagiriरत्नागिरी