शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे : नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

By शोभना कांबळे | Updated: October 1, 2022 17:34 IST

जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे आहे. या जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू, वृक्ष लागवडीवर भर देऊन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.एम. देवेंदर सिंह यांनी आज, शनिवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. डॉ. पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी देवेंदर सिंह यांची बदली झाली आहे.देवेंदर सिंह यांनी आयआयटी रुडकी येथून  संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. रत्नागिरीत येण्याआधी ते पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. या पदापूर्वी त्यांनी अकोला आणि चंद्रपूर येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.भारतीय प्रशासकीय सेवेतील २०११ च्या बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. पाच वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडियाशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता.रत्नागिरीतील विमानतळाच्या टर्मिनलचे काम मार्गी लावणार असल्याचे देवेंदर सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे असून यंदा प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू करावयाचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी