शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मुंबईचा सोने व्यापारी रत्नागिरीतून गायब, त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने

By अरुण आडिवरेकर | Updated: September 21, 2022 12:08 IST

रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते.

रत्नागिरी : व्यावसायिक कामासाठी रत्नागिरीत आलेले मुंबईतील प्रसिद्ध सोने - चांदी व्यापारी कीर्ती कोठारी रत्नागिरी बाजारातून गायब झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची माहिती रत्नागिरीत पसरताच एकच खळबळ उडाली आहे.मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी सोने चांदीचे व्यापारी कीर्तिकुमार कोठारी (५५) हे राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले आहेत. कीर्तिकुमार हे मीरा भाईंदर येथील असून, ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात सोने चांदीचा माल विकण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. आठवडा बाजार येथील एका लॉजमध्ये ते राहिले होते. सोमवारी रात्री ते एमजी रोड येथील एका ज्वेलर्सकडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागत नाही. यासाठी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याजवळ सुमारे १० लाखांचे दागिने होते, अशी चर्चा आहे.सोमवारी रात्रीनंतर नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी रत्नागिरीतील व्यापाऱ्यांजवळ  चौकशी केली. मात्र, कोणतीच माहिती मिळत नसल्याने त्यांनी थेट रत्नागिरी गाठली. कीर्तिकुमार यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत असून, पोलिसांना  याबाबत माहिती देण्यात आली आहे. कीर्तिकुमार यांचे वास्तव्य ज्या लॉजमध्ये होते तिथे ते सोमवार पासून परत न आल्याचे सांगितले जात आहे. लॉजच्या खोलीत फक्त त्यांचे सामान आहे.रत्नागिरी येथील राम नाक्यात सोमवारी एका व्यावसायिकाला तिघांनी लुटले होते. तर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शहरातील माळनाका येथे एका महिलेला लुटाण्यात आले. पाठोपाठ घडणाऱ्या लुटीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता व्यावसायिकच गायब झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारी