शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

shiv bhojnalaya : रत्नागिरीत शिवभोजन थाळीत दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:25 IST

दहा रूपयात भरपेट जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात बोगस लाभार्थी आढळून आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रकार, पुरवठा अधिकारी यांनी घेतली दखल अन्न नागरी पुरवठा खात्याकडून होणार चौकशी

रत्नागिरी : दहा रूपयात भरपेट जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात बोगस लाभार्थी आढळून आला आहे.शिवभोजन थाळीचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांकडूनच शिवभोजन थाळीचा लाभ घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यां नी दखल घेतली असून, अन्न नागरी पुरवठा खात्याकडून याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.महाविकास आघाडीने निवडणुकीदरम्यान दहा रूपयात भरपेट जेवण देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर २६ जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.

रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालय, रेल्वे स्टेशन, एस्. टी. स्टॅण्ड आणि हॉटेल मंगला येथे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, शुभारंभ केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या योजनेत बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. या योजनेचा ठेका वाशी येथील डी. एम. एन्टरप्रायझेस या कंपनीला देण्यात आला आहे.

या ठेकेदाराने नेमलेल्या कामगारांपैकी दोन महिला सोमवारी रांगेत उभ्या राहून कुपन घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता, सुपरवायझरने आपणास रांगेत उभे राहण्यास सांगितल्याचेही सांगितले.दरम्यान, येथील सुपरवायझरने त्या दोघांची एंट्री रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर या प्रकरणाची दखल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घेतली असून, त्यांच्याकडून यादी घेतली जाईल. या यादीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले.रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात शिवभोजन थाळीचा बोगस लाभार्थींनी लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अन्न नागरी पुरवठा खात्याने दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयRatnagiriरत्नागिरी