शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून निघाले होते गावी, घरी न पोहोचल्याने घेण्यात आला शोध .. मात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:03 IST

त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले.

ठळक मुद्देपायी गावी निघालेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह विन्हेरे गाव परिसरातील जंगलात आढळला मृतदेह

खेड : कोरोनाच्या भीतीने ठाणे येथून गावी पायी यायला निघालेल्या तालुक्यातील हुंबरी येथील एका वृद्धाचा मृतदेह विन्हेरे गाव परिसरातील जंगलात आढळून आला. सदाशिव भिकू कदम असे या वृद्धाचे नाव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यानंतर घाबरलेल्या या वृद्धाने अन्य काही साथीदारांसह ३० एप्रिल रोजी ठाणे येथून चालायला सुरुवात केली होती.लॉकडाऊनपूर्वी हुंबरी येथून ठाणे येथे गेलेले सदाशिव कदम हे देखील तिथेच अडकून पडले होते. आपल्या भागातील काही युवक पायी गावी निघाले आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनीही त्यांच्या सोबत पायी गावी यायचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी ठाणे येथून निघालेले कदम आणि त्यांचे सहकारी ६ मे रोजी कशेडी घाटाच्या पायथ्याला पोहचले. कशेडी येथे पोलीस बंदोबस्त असल्याने या लोकांनी जंगलातील वाटेने जाण्याचा निर्णय घेतला असावा. सदाशिव कदम यांनी कशेडी येथून आपल्या पत्नीला फोन करून आपण सायंकाळपर्यंत घरी पोहचत असल्याचे सांगितले. विन्हेरे येथील जंगलातून वाट काढताना त्यांचे सहकारी पुढे निघून गेले आणि ते एकटेच मागे पडले.त्यांचे पत्नीशी झालेल्या बोलण्यानुसार ते ६ मे रोजी संध्याकाळपर्यंत ते हूंबरी येथे गावी पोहचायला हवे होते. मात्र, ७ तारीख उजाडली तरी ते गावी न पोहचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. नातेवाईकांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद होता. कदाचित कशेडी येथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विलगीकरण कक्षात ठेवले असावे, असा समज करून नातेवाईकांनी खेड पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर खेड तालुक्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमध्येही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही आढळून आले नाही.सदाशिव कदम यांचा शोध सुरु असतानाच ९ मे रोजी दुपारी खेड पोलिसांचा त्यांच्या नातेवाईकाना फोन आला. विन्हेरे येथील जंगलात एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांसोबत विन्हेरे येथील जंगल गाठले. या ठिकाणी आढळून आलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, तो मृतदेह सदाशिव कदम यांचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस