शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रकचालकाचा मृतदेह सापडला तवसाळ खाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:23 IST

संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातामधील बेपत्ता ट्रक चालक तब्बल ९ दिवसाने तवसाळच्या जयगड खाडीत मृतावस्थेत मिळून आला आहे. त्याच्या पँटच्या खिशामध्ये सापडलेल्या पॉकीटमधील वाहन चालक परवान्यावरून त्याची ओळख पटली आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त ट्रकचालकाचा मृतदेह सापडला तवसाळ खाडीतवाहन चालक परवान्यावरून ओळख पटली

गुहागर : संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातामधील बेपत्ता ट्रक चालक तब्बल ९ दिवसाने तवसाळच्या जयगड खाडीत मृतावस्थेत मिळून आला आहे. त्याच्या पँटच्या खिशामध्ये सापडलेल्या पॉकीटमधील वाहन चालक परवान्यावरून त्याची ओळख पटली आहे.बसवराज भिमाप्पा छुरी (३०, रा. हलगती, ता. रामदुर्ग) असे मृतावस्थेत मिळून आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. संगमेश्वर येथील शास्त्री पुलावर १६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता.

सिमेंट गोणी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला शास्त्रीपुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने १६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला होता. या अपघामध्ये ट्रकचालक बसवराज भिमाप्पा छुरी हा बेपत्ता झाला होता. गुरूवारी सकाळी ११ वाजता तवसाळ येथील काही ग्रामस्थांना तवसाळच्या जयगड खाडीमध्ये फेरीबोट धक्क्यासमोर अनोळखी मृतदेह आढळून आला होता.गुहागर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार हे घटनास्थळी दाखल झाले. खाडीतील मृतदेह बाहेर काढून त्याच्या पँटच्या खिशामध्ये पैशाचे पॉकेट सापडले. त्यामध्ये पैशाबरोबर वाहन चालक परवाना सापडल्यामुळे त्याची ओळख पटली आहे.

गुहागर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. शास्त्रीपुलाची नदी डिंगणीमार्गे भातगाव खाडी करत जयगड खाडीतून समुद्राला मिळते. त्यामुळे हा मृतदेह याठिकाणी आढळून आला.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी