शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: वादळामुळे कळाशी समुद्रात बोट बुडाली, सुदैवाने ६ खलाशांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:08 IST

स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण

देवगड : तालुक्यातील कळाशी समुद्र परिसरात गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची ‘त्रिवेणी’ (नोंदणी क्रमांक : आयएनडी-एमएच-५-एमएम ७३२) ही मासेमारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. या अपघातामुळे बोटीसह त्यावरील साहित्याचे अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, बोटीवरील सर्व ६ खलाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले आहे.हवामान विभागाने दिलेल्या वादळी वाऱ्याच्या सूचनेनंतर त्रिवेणी बोट देवगड बंदराकडे परत येत होती. मात्र, कळाशी परिसरात अचानक तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने बोटीच्या खालील बाजूच्या दोन फळ्या निघून गेल्या आणि बोटीत पाणी शिरले, असे बोटीचे तांडेल बसप्पा कुरे (वय ४३) यांनी सांगितले. त्यांनी तत्काळ वायरलेसद्वारे जवळील ‘देवयानी’ या बोटीला मदतीसाठी संपर्क साधला. देवयानी बोटीच्या तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दाेरीच्या साहाय्याने त्रिवेणी बोटीवरील तांडेलांसह ६ खलाशांना सुखरूप बाहेर काढले.या घटनेत बोट पूर्णपणे बुडाल्याने ती वाचविणे शक्य झाले नाही. बोटीवर ३ बॅरेल डिझेल, ४ डिस्को जाळे, वायरलेस उपकरण, आउटर बोर्ड (पाटे), टप, गॅस सिलिंडर, भांडी, दोरी आणि अंदाजे ३० क्रेट यांचेही नुकसान झाले. यामुळे बोटीचे मालक राजेंद्र भिलारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच, साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सागरी सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी भेट देऊन मालक आणि खलाशांची विचारपूस केली. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती गोळा करून १९ सप्टेंबर रोजी सकाळी मोका पंचनामा केला. अहवाल, बोटीची कागदपत्रे आणि छायाचित्रांसह साहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मालवण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहे.या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हवामान सूचनांचे काटेकोर पालन आणि सागरी सुरक्षा उपाययोजनांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.