रत्नागिरी : नाैकेवर एलईडी लाईट लावून मासेमारी करणारी नाैका सहायक मत्स्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. ही नाैका रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.१४) रात्री तालुक्यातील पूर्णगड समुद्रात करण्यात आली. ‘महिन’ नावाची ही नाैका माेहसीन अब्दुल गफूर वस्ता यांच्या मालकीची आहे.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत पथकासोबत रविवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान समुद्रात नौकेतून गस्त घालत होत्या. या गस्तीदरम्यान पूर्णगड समुद्रात ‘महिन’ (आयएनडी-एमएच-४-एमएम-५०९१) ही नाैका एलईडी लाईट लावून मासेमारी करत असल्याचे निदर्शनाला आले. त्यानंतर ही नाैका पथकाने नौका ताब्यात घेऊन मिरकरवाडा बंदरात आणली आहे. तसेच नाैकेवरील लाईट व लाईट पुरवणारी उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
दहा दिवसांपूर्वीही कारवाईअंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी गस्तीदरम्यान ४ डिसेंबर २०२५ राेजी मध्यरात्री १२:२५ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी समुद्रात एलईडी लाईट असलेली ‘हर्षाली’ (आयएनडी-एमएच-४-एमएम-१४१२) नौका पकडली. ही नाैका प्रवीण काशीनाथ दळवी यांच्या मालकीची असून, ही नाैका मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली आहे.पाच लाख दंडाची तरतूदएलईडी प्रकाशातील मासेमारी बेकायदेशीर असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनच्या सुधारीत नियमानुसार नौका मालकावर पाच लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.
Web Summary : Ratnagiri officials seized a boat, 'Mahin,' using illegal LED lights for fishing near Purnagad. The owner faces a hefty fine under maritime regulations. Earlier, another boat, 'Harshali,' was seized for similar violations. Such illegal fishing attracts penalties up to ₹5 lakh.
Web Summary : रत्नागिरी के अधिकारियों ने पूर्णगढ़ के पास अवैध एलईडी लाइटों का उपयोग करके मछली पकड़ रही एक नाव 'महिन' को जब्त कर लिया। मालिक पर समुद्री नियमों के तहत भारी जुर्माना लगाया गया है। इससे पहले, एक अन्य नाव, 'हर्षली' को भी इसी तरह के उल्लंघन के लिए जब्त किया गया था। ऐसे अवैध मछली पकड़ने पर ₹5 लाख तक का जुर्माना लगता है।