शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तोंडवळी किनारी महाकाय देवमासा मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 18:42 IST

मालवण - मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवर शनिवारी सकाळी ७ वाजता महाकाय देवमासा (ब्ल्यू व्हेल) मृतावस्थेत आढळून आला. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेत हा देवमासा जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी लावला. दरम्यान, तळाशील किनारी मृतावस्थेत देवमासा लागल्याने मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. महाकाय ...

मालवण - मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी किनारपट्टीवर शनिवारी सकाळी ७ वाजता महाकाय देवमासा (ब्ल्यू व्हेल) मृतावस्थेत आढळून आला. खोल समुद्रात जहाजाच्या धडकेत हा देवमासा जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक मच्छीमारांनी लावला. दरम्यान, तळाशील किनारी मृतावस्थेत देवमासा लागल्याने मच्छीमारांसह स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. 

महाकाय देवमासा मृतावस्थेत आचरा येथील काही मच्छीमाराना शुक्रवारी रात्री समुद्रात वाऱ्याच्या प्रवाहासोबत मालवणच्या दिशेने वाहून जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा मृतावस्थेतील देवमासा मालवणपर्यंतच्या किनाऱ्यावर लागण्याची मच्छीमारांनी शक्यता वर्तवली होती. शनिवारी सकाळी मासेमारीस जाणाऱ्या मच्छीमाराना समुद्र किनारी महाकाय मासा तरंगताना दिसला. 

मृतावस्थेतील व्हेल माशाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी सकाळीच सकाळी तळाशील किनारा गाठला. मच्छीमारानी त्या देवमाशाला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. त्या माशाची विल्हेवाट लावण्यासाठी भला मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत वन विभागाचे अधिकारी कार्यवाहीसाठी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. हा देवमासा २५ ते ३० फूट लांबीचा असून एखाद्या जहाजाच्या धडकेत जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे मच्छीमारांनी सांगितले.