शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या चकाकणाऱ्या लाटांनी कोकण किनारपट्टी उजळली, समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे द्योतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:48 IST

Ratnagiri News : रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

रत्नागिरी : रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा आकर्षणाचा विषय ठरत आहेत. फ्लोरोसंट लाइटप्रमाणे उजळून निघणाऱ्या या लाटा पर्यटकांसाठी पर्वणी असल्या तरी समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे हे द्योतक आहे.लाटा  उजळून टाकणारे हे  जीव  आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका (noctiluca). समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात आणि एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यामध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. नॉकटिल्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. तो काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो.  गणपतीपुळे, वरवडे, रिळ या किनाऱ्यावर त्या प्रथम दिसतात.  नंतर एक-एक दिवसाच्या अंतराने ते बसणी काळबादेवी व रत्नागिरीच्या मांडवी, भाट्ये किनारी दिसत आहेत. 

अचानक नॉकटिल्युका या प्राण्यांच्या संख्येत प्रचंड  वाढ होण्याची कारणे पाहता समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण, हिमालयीन तिबेटीयन पठारावरील  ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे दिसून येत आहेत.     - डाॅ. स्वप्नजा मोहिते, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNatureनिसर्ग