शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जीआय नोंदणीसाठी  शेतकऱ्यांमध्ये निरूत्साह-- नोंदणी आवश्यक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:26 IST

कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला असल्याने यावर्षीच्या हंगामात प्रथमच ‘जीआय’ टॅग असलेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी भौगोलिक निर्देशांकाचा टॅग वापरणे आवश्यक आहे. 

ठळक मुद्देअद्याप १५५ शेतकऱ्यांकडूनच नोंदणी

रत्नागिरी :  कोकणच्या हापूसला भौगोलिक निर्देशांक जाहीर झाला असल्याने यावर्षीच्या हंगामात प्रथमच ‘जीआय’ टॅग असलेला आंबा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी भौगोलिक निर्देशांकाचा टॅग वापरणे आवश्यक आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजार बागायतदार असून, आतापर्यंत १५५ बागायतदारांनीच भौगोलिक निर्देशाकांसाठी नोंदणी केली आहे. 

कोकणातील पाच जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या हापूसला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. हापूसचा टॅग वापरण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांनादेखील भौगोलिक निर्देशांकासाठी शुल्क भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता ‘हापूस’ नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. सध्या ‘जीआय’ मानांकनाकरिता नोंदणी केलेल्या  शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. मात्र,  शेतकऱ्यांची संख्या वाढल्यास कारवाई होऊ शकते. सध्या ‘जीआय’चा टॅग नसलेलाच आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. बहुतांश शेतकºयांनी नोंदणी न केल्यामुळे त्याचा गैरफायदा परराज्यातील आंबा बागायतदार घेऊ शकतात.

रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५० हजार आंबा बागायतदार आहेत. बागायतदारांची संख्या मोठी असताना जीआय मानांकनासाठी केवळ १५५ बागायदारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी १२५, तर सिंधुदुर्गमधील ३० जणांचा समावेश आहे. ज्यांना ‘हापूस’ या नावाने आंबा विक्री करायची असेल त्यांनी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारासह २६०० रूपये शुल्क भरणे आवश्यक आहे. यामध्ये २००० संस्थेचे शुल्क, तर ५०० केंद्र सरकारचे शुल्क आहे. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

 

‘जीआय मानांकनासाठी’ शुल्क भरून नोंदणी झाल्यानंतर भौगोलिक निर्देशांक म्हणून ‘हापूस’ किंवा ‘अल्फान्सो’ नावाचा वापर करता येणार आहे. नोंदणीकृत व्यक्तिंना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फळांसोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यावर कोणत्याही मोबाईलमध्ये फळांचे उत्पादक किंवा प्रक्रियेविषयीची माहिती उपलब्ध होणार आहे.  मात्र, ‘हापूस’च्या नावाचा बेकायदेशीररित्या वापर करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई होऊ शकते. दिवाणी, फौजदारी किंवा ग्राहक न्यायालयात त्यावर कारवाई होऊ शकते. हापूसचा टॅग वापरण्यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघ यांच्यापैकी कोणाकडेही नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 ‘जीआय मानांकना’बाबत शेतकरी अद्याप अनभिज्ञ आहेत. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघातर्फे रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या हंगामानंतर  दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांशी संपर्क साधून ‘जीआय’ मानांकनासाठी नोंदणी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रकाराला आळा बसेल.

- डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, 

कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था

टॅग्स :Farmerशेतकरीonlineऑनलाइन