शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळी फित आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:27 IST

Agricultruredepartment, college, 7th Pay Commission, dapoli, Ratnagiri राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळी फित आंदोलनकर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

दापोली : राज्यातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे.आश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात मंगळवारपासून हे आंदोलन सुरू झाले आहे. १ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ तारखेपासून लेखणी बंद, काम बंद, लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. कृषी विद्यापीठाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोरील ग्रंथालयाच्या प्रांगणामध्ये मंगळवारी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. २७ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.या आंदोलनामध्ये सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सरकारने कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढील आंदोलन आणि त्यामुळे होणारे त्रास टळेल, असे मत यावेळी प्रमुख नेत्यांनी मांडले...तर बेमुदत लेखणी बंदकाळ्या फिती आंदोलन केल्यानंतर आता १ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करतील. सहा नोव्हेंबर रोजी अधिकारी आणि कर्मचारी एक दिवस सामूहिक रजा घेऊन आंदोलन करतील. ७ नोव्हेंबरपासून सर्व अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा निर्णय कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला असून, त्याला सर्वांनी पाठिंबा दिला आहे.

चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. गेले अनेक महिने सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. कोरोना संकटामुळे आम्ही थांबलो होतो. परंतु इतर विद्यापीठांना द्यायला सरकारकडे पैसे असतील, तर कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यायला अडचण का येते? हा आयोग लागू झाला नाही तर भविष्यात विद्यापीठातील कर्मचारी आंदोलन अधिक तीव्र करतील.- डॉ. विठ्ठल नाईक,अध्यक्ष, विद्यापीठ कर्मचारी संघटना

राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दीड वर्ष झाले. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना मात्र तो मिळालेला नाही. केवळ आश्वासने दिली जात आहेत. चतुर्थ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत नाही. काही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा हे आंदोलन अधिक चिघळू शकते.- सुनील दळवी, सहाय्यक कुलसचिव

टॅग्स :dapoli-acदापोलीcollegeमहाविद्यालय7th Pay Commissionसातवा वेतन आयोगRatnagiriरत्नागिरीagricultureशेती