शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी शहरावर जलसंकटाचे काळे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:38 IST

प्रकाश वराडकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी शहराला दररोज १५ ते १६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील साठ्यात मोठी घसरण झाली आहे. हा पुरवठा १२ एमएलडीवर आला आहे. शीळ धरणातील साठा बाष्पीभवनामुळे आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग जमू लागले आहे.शहराला शीळ धरणातून दररोज सुमारे १५ ते १६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. पानवल धरणातून १ ते २ दशलक्ष लीटर पाणी पुरविले जाते. मात्र, पानवल धरण हे दरवर्षी फेब्रुवारी किवा मार्च महिन्यात कोरडे होते. त्यामुळे पानवलचा पुरवठा आधी बंद होतो. नाचणे तलावातूनही अर्धा ते एक एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या पानवल व नाचणेचा पाणीपुरवठा बंद आहे.बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणारसध्या शीळ धरणातून शहराला १२ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शीळ धरणामध्ये कमी साठा असल्याने पाणी उपसा कमी करण्यात आला आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील साठा येत्या काही दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांना येत्या मे महिन्यात पाणी टंचाईशी सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत.१५ जूनपर्यंतचा साठा?गेल्या काही वर्षांमध्ये जुलै ते आॅगस्ट महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शीळ धरणात असायचा. गेल्या पावसाळ्यात सुरूवातीला दोन महिने जोरदार पाऊस झाला. त्यावेळी धरण पूर्ण भरले. मात्र नंतरच्या काळात पाऊस कमी झाला. त्यामुळे घसरलेली पाणी पातळी भरून आली नाही. परिणामी यंदा पाणी संकट निर्माण झाले आहे. चिपळूण पाटबंधारे विभागाकडे असलेल्या या शीळ धरणामध्ये सध्या १.३१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हे पाणी येत्या १५ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. पाऊस उशिरा सुरू झाला तर आधीच टंचाई, कमी दाबाने पाणी व जलवाहिन्यांची गळती यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे.जलवाहिनी फुटण्याचे प्रकारसध्या वापरात असलेली मुख्य जलवाहिनी जागोजागी फुटत असल्याने दुरुस्ती करण्यातच वेळ वाया जात असल्याने पंपाद्वारे पाणी उपसा करण्यासाठी कमी वेळ उपलब्ध होत आहे. शहराअंतर्गत वितरण वाहिन्याही जुनाट झाल्याने सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे असून, गेल्या पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.दररोज टॅँकरच्या ५०-५५ फेºयाअपुºया पाणी पुरवठ्याची गंभीर स्थिती पाहता गेल्या तीन महिन्यांपासूनच १५ प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जातो. सध्या दररोज ५ टॅँकरद्वारे ५० ते ५५ फेºया करून शहरवासियांना पुरवठा केला जात आहे. तरीही टॅँकरद्वारे पाण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे.