शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

भाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:22 IST

भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप आहे. ही भारतीय जनता पार्टी आलेल्या कार्यकर्त्यांचे रक्त शोषून घेऊन दोन वर्षांत यांना फेकून देणार आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी लांजा येथे केले.

ठळक मुद्देभाजपकडे भुंगे आकर्षित, विजय भोसले यांचा आरोप लांजा येथे काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

लांजा : भाजपकडे सध्या भुंगे, पाखरे आकर्षित होत आहेत. या भूमीवर पिश्चर प्लॅन्ट वनस्पती आहे. ही वनस्पती आपल्या सुगंधाने भुंगे आकर्षित करते, भुंगे बसले की, आपल्या पाकळ्या बंद करून घेते आणि बसलेल्या भुंग्यांचा नायनाट करते. ही पिश्चर प्लॅन्ट वनस्पती म्हणजेच भाजप आहे. ही भारतीय जनता पार्टी आलेल्या कार्यकर्त्यांचे रक्त शोषून घेऊन दोन वर्षांत यांना फेकून देणार आहे, अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी लांजा येथे केले.लांजा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी बहुद्देशीय सभागृह लांजा येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी विजय भोसले हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या देशात भाजपचे सरकार आहे. या भाजपमध्ये भगवे लोक मुख्यमंत्री होत आहेत. याआधी तुम्ही कधी पाहिले आहे का ? बेटी पढाओ... बेटी बचाओ... म्हणणारे हे पंतप्रधान यांच्या नाकाखाली दोन बलात्कार होतात. त्यामध्ये यांचेच लोक आहेत. त्यांच्यावर हे कारवाई करत नाहीत. हा सर्व भंपकपणा आहे, याची चीड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आली पाहिजे. या रागाचा बदला घेतला पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.यावेळी लांजा तालुकाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद, राजापूर तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर, अ‍ॅड. सदानंद गांगण, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महिला तालुकाध्यक्षा धनिता चव्हाण, शहर अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, विश्वास चौगुले, अकबर नाईक, सुरेश साळुंखे, बाप्पा पाटोळे, शांताराम गाडे, बंडोपंत जाधव, नाना सप्रे, बब्या हेगिष्ट्ये, मनोहर पाटोळे, राजाराम गुरव, सुचित्रा गांधी, राजू राणे, अ‍ॅड. राहुल देसाई, प्रकाश लांजेकर, राजापूरचे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शरफू काझी उपस्थित होते. यावेळी शिल्पा कांबळे हिची काँग्रेस पक्षाच्या युवा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले.निष्ठेने पक्षात राहाकाँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निष्ठेने राहिले पाहिजे. संघटनेशी निष्ठा असली पाहिजे संघटनेचे जे नेतृत्व आहे त्यांच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, पक्षाबरोबर काही झाले तरी निष्ठा असली पाहिजे. आम्ही गेली ३५ वर्ष काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहेत, आम्ही कधीच निष्ठा सोडली नाही, असेही यावेळी विजय भोसले म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी