शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

याआधी भिडेंना पळवले, आता सोडणार नाही!, चिपळुणातील राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा इशारा

By संदीप बांद्रे | Updated: August 1, 2023 19:16 IST

'​​​​​​​भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला परवानगी नाकारावी'

चिपळूण : देशातील राष्ट्रपुरूष, संत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे येथे 3 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संस्था, संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. समाजामध्ये धार्मिक व सामाजित तेढ निर्माण करणाऱ्या भिडेंच्या येथील दौऱ्याला परवानगी नाकारावी, अन्यथा त्यांना याआधी चिपळुणातून पळवून लावले, पण आता सोडणार नाही, अशा शब्दात विविध दहा संघटनांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत इशारा दिला.   यासंदर्भात काँग्रेसचे तालूकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, फैसल पिलपिले, कबीर काद्री,  शिवसेना ठाकरे गटाचे तालूकाप्रमुख विनोद झगडे, रिपब्लीकन सेनेचे संदेश मोहीते, वंचित बहुजन आघाडीचे सुभाष जाधव, महेश सकपाळ, विलास मोहीते, बलशाली युवा हृदय मंचाचे शिरीष काटकर, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मुझफ्फर सय्यद, संभाजी ब्रिगेडचे सुधीर भोसले, सुबोध सावंत देसाई आदींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भिडेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध दर्शवला.  दौरा झाला तर जोरदार निदर्शने केली जातील, असाही इशारा दिला.   भिडे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा यांच्यासह अनेक राष्ट्रपुरुषांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. देशाचे स्वतंत्र मान्य न करणे, देशाचे ध्वज नाकारणे हे देशद्रोहीसारखे कृत्य त्यांच्याकडून वेळोवेळी घडत आहे. धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करून सुस्कृत महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचे काम भिडे करीत आहेत. असे वादग्रस्त भिडे चिपळूणच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. भिडे यांच्याबाबत जनमानसात प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत भिडेंचा दौरा झाल्यास सुसंस्कृत तसेच सामाजिक सलोखा राखण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या चिपळूण शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण तालुका काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, कुणबी सेना, संभाजी ब्रिगेड, पूज्य गांधी प्रतिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम विचार मंच यांच्यासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी एकत्र येऊन भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकणातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत भिडे यांच्या कोकणातील कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा त्यांच्या दौन्याला कडाडून विरोध करून तीव्र निदर्शने केली जातील.भिडे यांच्या चिपळूण दौऱ्याला परवानगी नाकारावी अशी मागणीही प्रांताधिकारी आकाश लिगाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांयावतीने निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी