शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 16:29 IST

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देरत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजनएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यास प्रयत्नशील

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. चालवण्याचे महत्वपूर्ण काम चालक, वाहक करीत आहेत. सध्या रस्ते खराब असल्यामुळे ग्रामीण भागात काहीवेळा चालक एस. टी. घालण्यास तयार होत नाहीत. परंतु यामुळे विद्यार्थीवर्गाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

प्रवाशांना सौजन्याची वागणूक मिळणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांनीही एकसंघ राहून शासनाच्या सोयीसुविधा मिळविणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक पुनर्बांधणीचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष, आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक, विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्र अभियंता चालन विजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागातील रस्ते चांगले राहावेत, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनांसारख्या योजनांतून ८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्या संकल्पनेतून शासकीय निधीतून रत्नागिरी बसस्थानक १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत आहे. लवकरच लांजा बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन करताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित बसस्थानके उभारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ३५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यात येणारे रत्नागिरी बसस्थानक भविष्यात माईल स्टोन ठरणार आहे.

महामंडळाचा कर्मचारी शासकीय कर्मचारी व्हावा, अशीच लोकप्रतिनिधींची मागणी आहे. शिल्लक बसस्थानकांनाही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. मुंबई प्रादेशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी बसस्थानकाची रूपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी