शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण तालुक्यातील 'डिके' दाम्पत्य लग्नाच्या वाढदिवसादिवशीच करणार देहदान संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:42 IST

त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे

असुर्डे : मृत्यूनंतर शरीर न जाळता वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले, तर त्या शरीरातील काही अवयव जिवंत माणसाला उपयोगी पडतील, त्यातून त्याचे जीवन सार्थकी लागेल, हा विचार करून कुशिवडे (ता. चिपळूण) येथील भागाेजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागाेजी डिके यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. लग्नाच्या वाढदिवसादिवशी म्हणजे १९ फेब्रुवारी राेजी याची कार्यवाही पार पडणार आहे.

चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाला ६० वर्षे पूर्ण होऊन ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे.यामध्ये त्यांचे चिरंजीव विलास भागोजी डिके व विकास भागोजी डिके यांचे योगदान फार मोलाचे आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित, विलास होडे स्मृती वाचनालय आरवली यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता कुशिवडे येथे भागोजी बुधाजी डिके यांच्या निवासस्थानी तो आयोजित केला आहे.

यावेळी ‘देहदान सर्वश्रेष्ठ दान’ या विषयावर युयुत्सु आर्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वालावलकर रुग्णालय डेरवणचे वैद्यकीय पथक व सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम राणिम या उपस्थित राहणार आहेत. देहदानाबद्दल ज्या लोकांना माहिती घ्यायची असेल किंवा देहदान, अवयवदान व नेत्रदान करायचे असेल, तर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक कृषी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विलास होडे यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी