वाईटपणा आला तरी बेहत्तर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:22 AM2021-06-18T04:22:12+5:302021-06-18T04:22:12+5:30

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून ...

Better a poor horse than no horse at all. | वाईटपणा आला तरी बेहत्तर!

वाईटपणा आला तरी बेहत्तर!

googlenewsNext

७३व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य भारतीय राज्य घटनेच्या लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये निवडणुकीद्वारे निवडून आलेले असतात. ग्रामपंचायत देशातील लोकशाहीचा मूळ पाया आहे. तसेच ग्रामपंचायतीला विकासाचा कणा मानले जाते. आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर कठपुतळी बाहुलीसारखे आपण कुणाच्या तरी दोराला बांधले नसल्याचे स्मरण व्हावे. आपली सावली आपणच निर्माण करायला हवी. निसर्गाच्या नियमानुसार मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाडे कधीच मोठी होत नाहीत. समाजात आपल्या ज्ञानानुसार किंमत ठरविली जाते. शासकीय कामकाजात प्रशासकीय अधिकारी समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाच्या औकातीप्रमाणे सहकार्य करण्यास तत्परता दाखवितात. पक्ष, पार्टी, नेता म्हणून नव्हे. कदाचित दाखवत असतील तर तो क्षणिक फार्स समजावा. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक काम करून घेण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या अथवा पुढाऱ्याची आवश्यकता नसते. प्रशासनाला कायद्यानुसार काम करणे अनिवार्य असतं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन आपली जबाबदारी चोख बजावत आहे. आता केवळ प्रत्येकाने प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे. मग अशा कामासाठी समाजात किंवा गावात वाईटपणा आला तरी चालेल. पण गप्प बसून राहिलो, तर त्याचे परिणाम सहन करावे लागतील. प्रत्येकानेच याचे भान ठेवून पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्राम कृती दलाच्या साथीने सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, ग्राम कमिटी, देवस्थान व अन्य संस्थांनी जबाबदारी स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. केवळ कोरोनाला हरवण्यासाठी नव्हे, तर गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल प्रत्येकाने टाकण्याची गरज आहे. त्यासाठी गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले, तर त्याच्या घरातील सदस्यांची वेळीच कोरोना चाचणी करून घ्यावी. दशक्रिया व उत्तरकार्य विधी गाव व समाज जमवून न करता घरगुती पध्दतीने पूर्ण करावेत. तसेच या विधीसाठी गावागावातून येणाऱ्यांना आता थांबवायला हवे. तरच गावागावातून होणारा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकतो. चिपळुणात नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत पहिल्या लॉकडाऊनमध्ये ग्रामस्थांचे जसे सहकार्य मिळाले, तसे आता मिळत नाही. गावात कोणी वाईटपणा घेण्यास तयार नाही, असे सांगितले गेले. यावर आमदार भास्कर जाधव यांनी जिथे जिथे वाईटपणा आडवा येत आहे, तिथे मला सांगा, वाईटपणा आला तरी बेहत्तर अशी भूमिका स्पष्ट केली. याच पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

- संदीप बांद्रे

Web Title: Better a poor horse than no horse at all.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.