शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रत्नागिरी जिल्ह्यात खावटी कर्जधारकच नाही, योजनेचे लाभार्थी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:18 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणीच लाभार्थी नाहीत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात खावटी कर्जधारकच नाहीशेतकऱ्यांना लावणी किंवा पेरणीसाठी तात्काळ कर्ज वितरण

रत्नागिरी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात एकही खावटी कर्जधारक नसल्यामुळे या योजनेचे जिल्ह्यात सध्या तरी कोणीच लाभार्थी नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखाची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र अद्याप १२ हजार ५३ शेतकरी प्रतिक्षा यादीमध्ये आहेत. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ पर्यत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्ह्यातील त्यातील १४ हजार ९८८ शेतकऱ्यांना ४५ कोटी ८५ लाखाचे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.सन्मान योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यत कर्ज माफी व दीड लाख वरील शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ४२४ शेतकऱ्यांना एकवेळ समजोता योजनेतंर्गत ३ कोटी ८४ लाखाची कर्जमाफीचा लाभ मिळाली आहे.शासनाने २०१५-१६ व २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या एकूण १९ हजार ७२९ शेतकऱ्यांना १९ कोटी २५ लाख रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे.बचतगटातील महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी सणासाठी जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या सदस्यांसाठी माऊली बचतगट खावटी कर्ज योजना सुरु केली असून गटांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी रु. ३ लाख पर्यंतचे कर्ज वितरण करण्यात येते. याशिवाय ९२१७ शेतकऱ्यांना शेतीपूरक खावटी कर्ज देण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिकतर्फे खावटी कर्ज योजना १९७८ पासून राबविण्यात येत आहे. राज्य सरकार खावटी कर्ज योजना राबविताना ३० टक्के अनुदान व ७० टक्के कर्ज या पध्दतीने कर्ज वितरण करीत असते. रत्नागिरी जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यातून या प्रकारचे कर्ज वितरण होत आहे. शेतकऱ्यांना लावणी किंवा पेरणीसाठी तात्काळ कर्ज वितरणासाठी खावटी कर्ज देण्यात येते. सातबारावरील जमिनीप्रमाणे कर्ज वितरण करण्यात येते (हेक्टरी ४० हजार कर्ज देण्यात येते. २० हजाराची मर्यादा आहे) 

शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण ३५ हजार १४१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ९३ लाखची कर्जमाफी मिळाली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्हा बँकेचे २६ हजार ३८० लाभार्थी असून ३२ कोटी १८ लाख ३२ हजाराची कर्जमाफी मिळाली आहे. राष्ट्रीयकृत २०२२ शेतकरी असून ६ कोटी ९० लाख २६ हजाराची कर्जमाफी देण्यात आली आहे. जिल्हा बँकेकडून खावटी कर्जाऐवजी सुधारीत पिक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.- जीवन गांगण,कार्यकारी संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी