शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बारसूच्या कातळशिल्पाने वेधले जगातील इतिहास अभ्यासकांचे लक्ष; मानवी उत्क्रांतीचे गूढ उलगडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:26 IST

या इसवीसनपूर्व  संस्कृतीमध्ये सापडलेल्या  सीलचे रेखाटन  बारसूच्या कातळशिल्पावर सापडल्याने इतिहास अभ्यासकांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

विनोद पवार -

राजापूर :  शहरापासून सुमारे सात किलोमीटरच्या अंतरावर सापडलेल्या कातळशिल्पांमुळे राजापूर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर चमकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातही बारसूचे एक कातळशिल्प युनेस्कोच्या प्राथमिक यादीत स्थान मिळवणारे ठरले असून, या कातळशिल्पाचा योग्य पद्धतीने अभ्यास झाल्यास इसवीसनपूर्व मानल्या जाणाऱ्या इंडसव्हॅली, मिश्र (इजिप्त), मेसोपोटेमियन (इराण इराक) व चायना संस्कृतीचा उगम राजापूर बारसू येथूनच झाल्याचे उघड होण्यास वेळ लागणार नाही. या इसवीसनपूर्व  संस्कृतीमध्ये सापडलेल्या  सीलचे रेखाटन  बारसूच्या कातळशिल्पावर सापडल्याने इतिहास अभ्यासकांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. मानवाच्या इतिहासाचा अभ्यास करताना आज इंडसव्हॅली, मिश्र म्हणजे आताचे इजिप्त, मेसो पोटॅमियन म्हणजे आजचे इराण इराक व चीन या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. इंडसव्हॅलीमधील मोहंजोदडो व हडप्पा या संस्कृती अतिशय विकसित मानल्या जातात. या संस्कृतीशी साधर्म्य असलेले चित्र  बारसूच्या सड्यावर कोरलेले आहे. एक मानव आपल्या दोन्ही हातांनी दोन वाघांच्या मानेला धरून उभा असल्याचे हे चित्र मोहेंजोदडो, इजिप्त, इराक - इराण व चीन इथे सापडलेल्या सीलवरील चित्राशी साधर्म्य  आहे. या  संस्कृतीत सापडलेली सील ही त्यावेळी चालणाऱ्या  व्यापाराची प्रतिके मानली जातात, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. या चार प्राचीन संस्कृतींमध्ये व्यापारी संबंध होते. बऱ्याच वेळा त्यावेळी कातडी बॅगमधून महत्त्वाच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवल्या जायच्या  व त्यावेळी त्यावर सील लावले जायचे. ही सील चौकोनी आकाराची असत. ही सील टेराकोटा व अन्य प्रकारात तयार केलेली असत व त्यावर विशिष्ट फोटो अथवा चित्र असायचे. ही सर्व सील व त्यावरील दोन्ही बाजूच्या वाघांच्या मानेला पकडून उभा असलेला मानव याचे मूळ चित्र बारसूच्या कातळसड्यावर सापडणे म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा पाया इथूनच असेल  का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जागतिक इतिहासकारांंनी बारसूमधूनच अभ्यासाला सुरुवात केल्यास वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प