रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.संजय सावंत सोमवारी सकाळपासून बेपत्ता होते. सोमवारी दुपारी भाट्ये पुलानजिक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला होता. अधिक शोध घेतला असता दुपारी मांडवी किनाऱ्यानजिक सावंत यांचा मृतदेह आढळून आला. संजय सावंत जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात कर्ज विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघड झाली. दुपारी त्यांचा मृतदेह मांडवी समुद्रकिनारी सापडला.स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अनिल लाड हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सावर्डे भुवडवाडी येथील संजय सावंत हे कर्ला-आंबेशेत येथे वास्तव्याला होते. गेल्या सहा वर्षांपासून ते कर्ज विभागात उपव्यवस्थापक सेवेत होते. संजय सावंत यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाईकांसह जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदींनी जिल्हा शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती.
रत्नागिरीत बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:06 IST
त्नागिरीतील जिल्हा बँकेच्या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. संजय तुकाराम सावंत (४६) असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. संजय सावंत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
रत्नागिरीत बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
ठळक मुद्देरत्नागिरीत बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, कारण गुलदस्त्यातमांडवी किनाऱ्यानजिक आढळला मृतदेह