शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील 'या' पर्यटन ठिकाणांवर बंदी, पोलिस प्रशासनाची करडी नजर 

By शोभना कांबळे | Updated: July 26, 2023 14:35 IST

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात ...

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या काही धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यादृष्टीने सवतकडा, खोरनिनको, प्रभानवल्ली आदी ठिकाणांवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होतात. त्यामुळे हे मनोहर दृश्य पाहाण्यासाठी तसेच या धबधब्यांखाली स्नानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनप्रेमी मोठ्या संख्येने अशा धबधब्यांच्या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी जातात. सध्या पावसाळ्यात धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने या ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, काही वेळा धबधब्यांच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात. काही वेळा जीवघेण्या घटनाही घडतात. यापुर्वी काही धबधब्यांवर अशा घटना घडल्या आहेत. काही पर्यटक सेल्फीच्या नादात पाय घसरून पडल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.सध्या मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना पायबंद व्हावा, या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यात चिपळूण तालुक्यातील सवतकडा, लांजा तालुक्यातील खोरनिनको, प्रभानवल्ली आदी धोकादायक ठिकाणच्या धबधब्यांवर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.काही धबधब्यांवर नियमित गस्त ठेवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आल्याचेही सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसtourismपर्यटन