शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागेची प्रतिक्षा; यंत्रणा ‘हवेतच’

By मेहरून नाकाडे | Updated: August 8, 2023 13:30 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळावी, नुकसानभरपाई, पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०० हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागाने केंद्रासाठी जागेची पाहणी करून शासनाला अहवाल पाठवून सात महिने उलटले तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नसल्याने ‘स्वयंचलित हवामान केंद्र तूर्तास हवेत’ असा सूर उमटत आहे.हवामानातील बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रावरून पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग याची नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच पीक विमा योजनेचा लाभ देणे सुलभ होते. मात्र महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीच्या अचूकतेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहत आहेत. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारीची दखल घेत शासनाने महसूल मंडळाऐवजी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जागेची पाहणी करून कृषी विभागाला अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते.कृषी विभागाकडून ३०० ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याबाबतचा अहवाल डिसेंबरमध्ये शासनाला सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप तरी हवामान केंद्र उभारण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावरील हवामान केंद्राचा फायदा कृषी संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, मार्गदर्शनासाठीही होणार आहे.

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र आहे. याद्वारे तापमान, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा याची नोंद ठेवली जाते. महसूल मंडळातील गावागावातील तापमान वेगळे असल्याने नुकसानभरपाई / विमा परतावा देण्यास अडथळा उद्भवू नये यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ३०० गावात केंद्रासाठी जागेची पाहणी करून अहवाल पाठविण्यात आला आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामान