शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील काँग्रेस भुवन कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:14 IST

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला, जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांची कारवाईमाजी जिल्हाध्यक्षांसह अनेकजण कार्यालयाबाहेर ताटकळत

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे.रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अंतर्गत असणारे गटातटाचे राजकारण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह त्यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांना शह देण्यासाठी हुसेन दलवाई गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी विजय भोसले यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून टाकली आहे. त्यानंतर रत्नागिरीचे शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांना व्हॉटस्अ‍ॅपवरून मेसेज करून पदमुक्त केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.गुरूवारी सकाळी माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील काही कार्यकर्ते काँग्रेस भुवन येथे गेले होते. यावेळी पक्षाच्या कार्यालयाला नवीन टाळे टोकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर दरवाजावर जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या सहीचे पत्र चिकटविण्यात आले आहे. चावीबाबत संबंधित व्यक्तीकडे माणूस पाठवूनही ते न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष काँग्रेस भुवनचा सातबारा नावावर झाल्यासारखे वावरत आहेत. शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांना पदमुक्त करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. काँग्रेस पक्ष व्हॉटसअ‍ॅपवर चालत नाही.- रमेश कीर,सरचिटणीस प्रदेश काँग्रेस

दरवाजावर चिकटविले पत्रदरवाजावर चिकटविण्यात आलेल्या पत्रामध्ये काँग्रेस भुवन रत्नागिरीच्या चाव्या खालील व्यक्तींकडे उपलब्ध असतील. ज्यांना काँग्रेस भवन पक्ष कार्यासाठी उघडे पाहिजे किंवा इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना हवे असल्यास त्यांनी कामाचे स्वरूप सांगून चावी घ्यावी. असे लिहिण्यात आले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी