शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरुन एकाचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 18:40 IST

इमारतीच्या गच्चीवर चढून त्याने प्रथम मुलांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार यांनी चतुराईने धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून घेतले.

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत एकाने दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला. दळवटणे येथील महेश नारायण नलावडे (४५, रा. दळवटणे, चिपळूण) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुदैवाने यात कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. नलावडे यांना नगर परिषदेतील अधिकारी व पोलिसांनी वाचवले.महेश नलावडे हा सध्या चिपळूण शहरातील खेंड परिसरात राहतो. त्याला दोन लहान मुलगे आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी व त्याच्यामध्ये वाद झाले होते. त्यामुळे ते विभक्त राहतात. शुक्रवारी दुपारी तो दोन्ही मुलांना घेऊन बाजारपेठेत आला आणि सर्वांची नजर चुकवत थेट चिपळूण नगर परिषद इमारतीवर मुलांना घेऊनच चढला.इमारतीच्या गच्चीवर चढून त्याने प्रथम मुलांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार यांनी चतुराईने धाव घेऊन दोन्ही मुलांना त्याच्या तावडीतून खेचून घेतले. परंतु, महेश नलावडे याने स्वतः मात्र इमारतीवरून उडी घेतली. सुदैवाने केबलचा अडथळा आला तसेच नगर परिषद कर्मचारी  पोलीस व नागरिकांनी खाली ताडपत्री पकडून ठेवली होती. त्यामुळे तो थेट ताडपत्रित पडल्याने बचावला आहे. त्याला नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी