शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

असुर्डे :  सत्तेची मस्ती आलेल्या सरकारला आंबेडकरी जनता माफ करणार नाही  - जयदेव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:20 IST

अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही,

ठळक मुद्देआ. जयदेव गायकवाड:  प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावरही टीका आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही

असुर्डे : अच्छे दिन च्या नावाखाली जनतेची फसवणूक करुन देश पर्यायाने राज्य देशोधडीला लावणाऱ्या व सत्तेची मस्ती आलेल्या राज्य आणि केंद्र शासनाला आंबेडकरी जनता माफ करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड यांनी सावर्डे येथे पत्रकार परिषदेत दिला. आंबेडकरी जनतेत केवळ आपल्या स्वार्थासाठी उभी फुट पाडणाऱ्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांची क्रेझ संपली आहे.

आंबेडकरी जनता यांना कंटाळले आहे. प्रकाश आंबेडकराचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार आहे. आठवलेंनी आपल्या मंत्रीपदासाठी रिपब्लिकन पक्ष मोदींच्या दावणीला बांधला. महाराष्ट्रात त्याचा एकही आमदार नाही.  यामध्ये आंबेडकरी जनतेची मोठी फरफटझाली.  आठवले व प्रकाश आंबेडकर यांनी विश्वासार्हता गमावली आहे. आठवले जनतेला भाजपकडे न्यायला लागलेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असता. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्या भाजपबरोबर आंबेडकर जनतेने जावे का? भाजप हा हिंदूत्ववादी फॅसिस्ट पक्ष आहे. आंबेडकरवादी सामान्य माणूस कधीही भाजपलापाठिंबा देणार नाही. की मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ पक्षाचे रजिस्ट्रेशन करणारा मी कार्यकर्ता आहे. चळवळ पुढे गेलीच नाही. आमच्या आयुष्यातील अठरा वर्षे वाया गेलीत. अशा चळवळीत यश मिळत नसेल तर टाचा घासत बसण्यात काही अर्थ नाही.  प्रकाश आंबेडकरांनी कॉग्रेस सारख्या पक्षाचा स्विकार केला असता तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. आता आंबेडकर जनता ठप्प आहे. एमआयएमला पाठिंबा दिल्या पासून आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकरांच्या पासून दूर जावू लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आंबेडकर जनतेला न्याय देवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRatnagiriरत्नागिरी