आरवली :
समत्व ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या प्रेरणेतून चिपळूण येथील पूरग्रस्तांना एक सामाजिक कर्तव्य या भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नरेंद्र खानविलकर यांच्याहस्ते करण्यात आले.
आजूबाजूच्या गावातील स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या पाहणीतून खरोखरच गरजू कुटुंबांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर खेर्डी, मुरादपूर, शंकरवाडी, वाणीआळी, पवारआळी, मार्कंडी, साबळे रोड, ओतारी गल्ली, खेंड, बाजारपेठ या ठिकाणी कुटुंबांना त्यांच्या घरी जाऊन मदत देण्यात आली.
या कार्याला रूपेश कांबळे, रेश्मा वाजे, गणपत दाभोळकर यांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यासाठी चिपळूणचे विराज भालेकर व प्रणित कांबळे यांचे सहकार्य मिळाले.