शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर निघाले परतीला, रत्नागिरीतून एसटीच्या १६५ जादा गाड्या रवाना; प्रवाशांची गर्दी

By मेहरून नाकाडे | Updated: September 5, 2022 18:48 IST

प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार

रत्नागिरी : गौरी-गणपतीचा सण साजरा करून विसर्जन होताच काही मुंबईकर परतीसाठी निघाले आहेत. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी भाविकांना घाई झाली आहे. सोमवारी गणेश विसर्जन झाल्याने सायंकाळी जादा गाडीने मुंबईरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रेल्वे, खासगी गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे सोमवारी १६५ जादा एसटी मुंबईकडे रवाना झाल्या.कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सलग दोन वर्ष असलेले कोरोना निर्बंध यावर्षी नसल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी गावाकडे आले होते. मुंबई व उपनगरातून जिल्ह्यात १८२५ जादा गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांना घेवून आलेल्या एसटी बसेस प्रत्येक आगारात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव साजरा करून सोमवारपासूनच परतीसाठी एसटीच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंडणगड आगारातून ७, दापोली ५६, खेड २५, चिपळूण २८, गुहागर ८, देवरूख १७, रत्नागिरी १७, लांजा ६, राजापूर आगारातून एक एसटी मिळून एकूण १६५ गाड्या सायंकाळनंतर मुंबईकडे रवाना झाल्या.अनंत चतुर्दशी दि.९ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे रविवार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ५ रोजी १६५ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्वाधिक जादा गाड्या दि. ६ सप्टेंबर रोजी सुटणार असून, जिल्ह्यातून ६३० गाड्या मुंबई मार्गावर धावणार आहेत. दि. ७ रोजी ३५० गाड्यांचे नियोजन आहे. दि. ११ पर्यंत जादा गाड्या सुटणार असून प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ७५० गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय दैनंदिन १०० गाड्या मुंबई मार्गावर धावत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबई