शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पावसाचे आगमन, मात्र, गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेने यंदा पाऊस कमी

By शोभना कांबळे | Updated: June 26, 2023 18:39 IST

हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला

रत्नागिरी : पावसाने शनिवार (दि.२४)पासून दमदार सुरूवात केली आहे. मात्र, ठराविक सरी वगळता पाऊस म्हणावा तसा अजुनही सुरू झालेला नाही. पावसाचे अजुनही सातत्य दिसून येत नाही. अधूनमधून विश्रांती सुरू असल्याने अजुनही उकाडा कायम आहे. गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा यंदा पाऊस ५० टक्केच पडला आहे. गेल्या २४ ताासात सर्वाधिक पाऊस मंडणगडमध्ये झाला असून दापोली, चिपळूण, राजापूर येथेही अधिक पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाची सुरूवात झाली आहे. मात्र, ठराविक वेळेलाच पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. जून महिन्यात सलग पडणारा पाऊस यंदा कमी झाला आहे. शनिवारी सकाळपासून पावसाने चांगलाच जोर घेतला होता. रविवारीही पाऊस पडेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी काही वेळ पडून थांबत होता. मात्र, मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून त्याखोलाखाल दापोली, राजापूर, चिपळूण येथे पाऊस झाल्याची नोंद आहे.सोमवारी सकाळीही चिपळूणमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. मात्र, अन्य तालुक्यांमध्ये काही सरी वगळता अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे अजुनही म्हणावा तेवढा पाऊस सुरू झाला नसल्याने उकाडाही होत आहे. गेल्या जून महिन्याच्या निम्म्यापेक्षाही यंदा पाऊस कमी झाला आहे.हवामान खात्याने मंगळवार, दि. २७ रोजी आॅरेंज अलर्ट जाहीर केला असून त्यापुढील तीन दिवस जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे आता पुढे काही दिवस पाऊस जोरदार कोसळेल, अशी शक्यता वाटत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस