शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये शिवसेना व कदम समर्थकांमध्ये जोरदार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:05 IST

बैठकीला शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षल शिरोडकरखेड : शिवसेनेतील अंतर्गत वाद अजून शमण्याचे नाव घेत नसून, आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीचे पडसाद आज भरणे (ता. खेड) येथील शिवसेनेच्या बैठकीत उमटले. बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कदम समर्थक एकमेकांना भिडल्याने जोरदार राडा झाला. त्यानंतर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बैठकीतूनच काढता पाय घेतला.दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक खेड तालुक्यातील भरणे येथे बिसू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बैठक शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आमदार योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. त्यामुळे बैठकीत उपस्थित कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर माजी तालुकाप्रमुख राजा बेलोसे आणि युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांनी बैठक सोडून पळ काढला.शिवसेना तालुका सचिव सचिन धाडवे यांनी आमदार योगेश कदम व माजी मंत्री रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठराव मांडावा अशी भूमिका घेतली. त्यावर कोणतीही भूमिका न घेता जिल्हाप्रमुख कदम यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत कदम समर्थकांनी अजिंक्य मोरे यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच गाठून तंबी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना