शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आणखी एका अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 14:58 IST

Crimenews Ratnagiri : सुसंस्कृत म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरीत हळूहळू अवैध धंद्यांना उत येऊ लागला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरीत अनैतिक व्यवसायाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर गुरूवारी रात्री आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत आणखी एका अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाशपीडित मुलगी ताब्यात : एका महिलेसह शहर पोलिसांनी केली दोघांवर कारवाई

रत्नागिरी : सुसंस्कृत म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरीत हळूहळू अवैध धंद्यांना उत येऊ लागला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरीत अनैतिक व्यवसायाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर गुरूवारी रात्री आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे.

शहरातील नाचणे आय. टी. आय. मार्गावरील एका इमारतीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर धाड टाकून पोलिसांनीं एक महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाचणे मार्गावरील आय.टी.आय. जवळील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेऊन, गिऱ्हाईक आणून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठविले. यावेळी मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गिऱ्हाईक आणून , अनैतिक व्यवसाय सुरू आहे, याची खात्री पोलिसांना झाली. त्यनंतर पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी तिथे एक पीडित मुलगी व तिचेकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारी व्यक्ती असे दोघेजण सापडले.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव रावसाहेब जगन्नाथ माळी (वय ४२ वर्षे, रा. भेकराईनगर, बसस्टॉप शेजारी, ता. हवेली, जि. पुणे -मूळ रा. कासेगांव, ता . वाळवा, जि . सांगली ) असे त्याने सांगितले. त्याने आपल्यासोबत एका स्त्री साथीदार असून, तिच्यासह स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गिऱ्हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली.याप्रकरणी पोलिसांनी रावसाहेब माळी व त्याची एक स्त्री साथीदार यांच्या विरुध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा करुन दाखल करुन रावसाहेब माळी याला अटक केली आहे . तसेच पीडित मुलीस महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक अनिल लाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी