आवाशी : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत याेजना केमिकल कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा वायू गळती झाल्याची घटना घडली. मात्र, कंपनीने वेळीच उपाययाेजना करुन त्यावर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.योजना केमिकल कंपनीत ओलीयम वायूची गळती होऊन परिसरातील चाळकेवाडी, तलारीवाडी येथील ग्रामस्थांना श्वसनाचा व गुडा मारण्याचा त्रास होऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, कंपनीने वेळीच उपाययोजना करून त्यावर नियंत्रण मिळविले. वायू गळतीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी खबरदारी घेत प्रसंगावधान राखले. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे लोटे आणि परिसरातील ग्रामस्थांवर जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे.
Ratnagiri: लोटेतील कंपनीत पुन्हा वायू गळती, परिसरातील ग्रामस्थांवर जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:14 IST