शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचा कोकणातील आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर

By मनोज मुळ्ये | Updated: March 5, 2025 21:13 IST

एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, दापोली : पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे, नंतर राष्ट्रवादीतून आमदार झालेले आणि अलिकडेच उद्धवसेनेत प्रवेश केलेले दापोलीचे माजी आमदार आणि सध्याचे उद्धव सेनेचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय कदम आता शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली असून, १३ मार्चला ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

माजी आमदार राजन साळवी, सुभाष बने यांच्यापाठेपाठ आता आणखी एक माजी आमदार उद्धवसेना सोडून शिंदेसेनेत जात आहे.ज्यांच्याशी संजय कदम यांचा प्रमुख राजकीय वाद होता, ते माजी मंत्री रामदास कदम यांच्यासह त्यांनी स्नेहभोजनही घेतले असल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय वाटचाल सुरू करणारे संजय कदम त्या काळी रामदास कदम यांचे मानसपुत्र होते. मात्र त्यांच्याशी झालेल्या वादानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. २०१४ मध्ये ते दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार झाले. २०१९ मध्ये ते शिवसेना उमेदवार योगेश कदम यांच्यासमोर पराभूत झाले.

रामदास कदम आणि योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसातच संजय कदम यांनी उद्धवसेनेमध्ये प्रवेश केला आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा योगेश कदम यांच्याशी लढत दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. आता ते शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने यांच्यापाठोपाठ आता आणखी एक माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर जात असल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी एक धक्का ठरणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी