शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

By शोभना कांबळे | Updated: March 27, 2024 13:51 IST

चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली

रत्नागिरी : समाजातील अंधश्रद्धा दूर करायच्या असतील, तर आपल्याला लोकांमध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कारामागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते, हे पटवून द्यावे लागेल. याच उद्देशाने खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये होळीच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान स्पष्ट केले.कोकणात शिमगाेत्सव खूप मोठा सण असून, या सणानिमित्ताने मुंबई, पुणे या ठिकाणचे सर्व लोक आपल्या मूळ गावी येतात. या सणाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील देवसडे गावामध्ये मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळाकडून सालाबादाप्रमाणे होळीच्या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर यांनी देवसडे गावची होळी पाण्याने पेटवून त्यामागचे विज्ञान सांगितले. जगातील सर्व आगी या पाण्याने विझवल्या जातात. पाण्याने होळी पेटणार असल्याने हा चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांनी भोंदूबाबा, भगत, मांत्रिक अशाच विज्ञानाचा वापर करून आजपर्यंत आपल्याला फसवत आले आहेत. आपण चिकित्सा करायला हवी. आपण विज्ञानाची साधने वापरायला शिकलो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला शिकलो नाही. आपल्या आजूबाजूला घडणारे चमत्कार हे वैज्ञानिक कसोटीवर तपासले पाहिजेत, असेही यावेळी सांगितले.अंनिस खेड शाखेचे कार्याध्यक्ष सचिन शिर्के यांनी प्रबोधनात्मक गीत गाऊन व्यसनमुक्तीबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीणचे खजिनदार व देवसडे गावचे ग्रामीण अध्यक्ष सुधीर वैराग, ग्रामीण सचिव संतोष कदम, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील कदम, सचिव रवींद्र शिगवण, ग्रामपंचायत सदस्य स्वाती वैराग, सल्लागार संजय कदम, मुंबई महिला मंडळ अध्यक्ष वैशाली कदम, ग्रामीण महिला अध्यक्ष निर्मला कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी