शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:19 IST

या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने भाविकांची गर्दी

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज, मंगळवारी (दि.१०) अंगारकी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी एकमेव अंगारकीचा योग जुळून आल्याने यात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बहुसंख्य भाविक स्वयंभू ‘श्रीं’च्या दर्शनासाठी उपस्थिती राहू शकतील, असा अंदाज आहे.अंगारकी यात्रा उत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, मिरज आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. घाटमाथ्यावरील काही निवडक गणेश मंडळांकडून भाविकांसाठी खिचडी प्रसाद व महाप्रसादाचे वाटपही केले जाते. यावर्षी २०२३ या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.भाविकांना दर्शन मिळण्यात कोणतीही अडचण ये मंदिर परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांगेच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच दर्शन रांगा व मंदिर परिसर, समुद्रकिनारा परिसरात विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे.पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले अंगारकी यात्रोत्सवासाठी स्वयंभू ‘श्रीं’चे मंदिर पहाटे ३:३० वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रारंभी मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर व त्यांचे सहकाऱ्यांकडून पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले.

कडक बंदोबस्तअंगारकी यात्रोत्सवासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलिस स्थानक सज्ज आहेत. एकूण २२  पोलिस अधिकारी व १७५ पोलिस कर्मचारी तसेच ३० राखीव पोलिस दलाचे कर्मचारी गणपतीपुळे परिसरात तैनात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर