शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

... आणि भैरीबुवा शपथांमधून सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:42 IST

रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे... आणि भैरीबुवा शपथांमधून सुटलाआता मंदिरात शपथा घेण्याला मनाई

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या विश्वस्त समितीने आता मंदिरात शपथा घेण्याला मनाई केली आहे. तसा फलकच मंदिरात लावण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात अनेकदा भैरीबुवाला वेठीस धरले जात असल्याने आता हा निर्णय घेण्यात आला आहे.नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपदी बसताना भैरीबुवासमोर मुदतीत राजीनामा देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी भैरी बुवासमोर आपला राजीनामा ठेवला होता.त्यानंतर शिवसेनेने सारवासारव करून राहुल पंडित यांचे कार्य चांगले असल्याचे सांगून तेच यापुढेही नगराध्यक्ष राहतील असे म्हटले होते. मात्र त्यांनी राजीनामा न देते रजेवर जावे असे ठरवण्यात आले. त्यामुळे भैरी बुवासमोर शपथ घेण्याचा मुद्दा पुढे आला होता.भैरी देवस्थान हे रत्नागिरीतील सर्वाधिक मानाचे स्थान आहे. शिमग्यात येथील उत्सव पाहण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक हजेरी लावतात. सर्वसाधारपणे १९९५ पासून राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम राबवताना भैरी मंदिरात नारळ ठेवण्याची पद्धत सुरू केली. हे देवस्थान मानाचे असल्याने भैरीबुवासमोर कोणीही खोटे बोलत नाहीत, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच पद सोडण्याच्या, विशिष्ट ठिकाणी मतदान करण्याच्या शपथा भैरीबुवासमोर घेतल्या जातात.केवळ राजकीयच नाही तर अराजकीय, कौटुंबिक शपथाही भैरीबुवासमोर घेतल्या जातात. गेल्या काही काळात त्याबाबतच्या चर्चा अधिक वाढल्या असल्याने आता देवस्थान विश्वस्त मंडळाने मंदिरात देवासमोर कोणालाही शपथ घेता येणार नाही, अशी सूचनाच एका फलकाद्वारे लावली आहे. या निर्णयाचे काहीजणांकडून स्वागत केले जात आहे, तर काहीजणांकडून त्याबाबत काहीशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. भैरीबुवासमोर खोटेपणा केला जात नसल्याने तो धाक लोकांमध्ये राहण्यासाठी अशी मनाई केली जाऊ नये, अशी भावनाही काहीजण व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेRatnagiriरत्नागिरी