शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरीतील करबुडेत, आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:05 IST

हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकीत स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे. तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले.

रत्नागिरी : देशातील एकमेव मुद्रांकीत क्रांती स्तंभ रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे उभारण्यात आला आहे. या दीक्षा भूमी क्रांती धम्म स्तंभाचे उद्या, मंगळवारी, (दि. १७) सकाळी ९ वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बौद्ध दीक्षा भूमी विकास समितीचे अध्यक्ष अमोल जाधव व मुंबई अध्यक्ष अनिल जाधव यांनी याबाबत माहिती दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनी ६५ वर्षापूर्वी करबुडे येथे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. रत्नागिरी तालुक्यातील निवळी, भोके, फणसावळे, आडोब, केळ्ये, वेतोशी, जांभरूण, खरवते, करबुडे या गावातील लोकांना दिनांक १६ मे १९५७ साली भैयासाहेब आंबेडकर आणि भदंत आनंद कौशल्यानंद यांच्या अधिपत्याखाली बौद्ध धम्माची दीक्षा याच स्तंभाच्या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतर बौध्द दीक्षा भूमी विकास समिती या संघटनेच्या तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांती स्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले. हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकीत स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे.या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन दीक्षा भूमी विकास समितीचे स्थानिक सचिव महेश सावंत यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी