शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विलोभनीय! गणपतीपुळेचा समुद्रकिनारा पुन्हा निळ्या लाटांनी चमकला

By अरुण आडिवरेकर | Updated: October 29, 2022 18:53 IST

गणपतीपुळेचा समुद्र रात्रीच्यावेळी खास आकर्षण ठरत आहे.

रत्नागिरी : गेली काही वर्षे ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत रत्नागिरीचे किनारे निळ्या लाटांनी चमकू लागले आहेत. गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील समुद्रकिनारा गेले तीन दिवस निळ्या लाटांनी चमकत आहे. त्यामुळे गणपतीपुळेचा समुद्र रात्रीच्यावेळी खास आकर्षण ठरत आहे.रत्नागिरीतील युवा छायाचित्रकार परेश राजीवले याने या लाटांचा नजराणा कॅमेराबद्ध केला आणि त्याची चर्चा सुरु झाली. रत्नागिरीतील समुद्रात ऑक्टोबर महिन्यात दिसणाऱ्या या निळ्याशार लाटा कुतूहलाचा विषय ठरत आहे. गुहागरसारख्या ठिकाणी या लाटा हिरव्या दिसल्या होत्या.नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो. खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या ‘निऑन लाईट्स’ सारख्या हिरव्या, निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे. ‘सी स्पार्कल’ म्हणूनही तो ओळखला जातो. सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या ‘विंटर ब्लूम्स’मुळे. 

निसर्गाची ही विलोभनीय निर्मिती आहे. त्याचा अनुभव रत्नागिरीच्या किनाऱ्यावर येत आहे. टप्याटप्याने या लाटा आता आरेवारे, काळबादेवी, मांडवी, भाट्ये, वायंगणी किनाऱ्यावरही दिसतील. निसर्गाची ही अद्भुत रचना पाहायला ‘मँगो सिटी रत्नागिरी’ला भेट द्यावी़ - सचिन देसाई, रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर