शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगडमधील वडाप व्यावसायिकाचे तिन्ही खुनी गजाआड, तिघेही दापोलीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:56 IST

प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असतानाही तांत्रिक तपासाचे आधारे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत दापोलीतील तिघांना अटक केली आहे. पैशाची चणचण असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली या तीनही आरोपींनी दिली आहे.

ठळक मुद्देमंडणगडमधील खुन पैशासाठीच पोलिसांनी लावला ४८ तासात खुनाचा छडाताब्यात घेतलेले तिघेही दापोलीतील रहिवासीपैशाची चणचण असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली

मंडणगड ,दि. ०४ : प्रत्यक्षदर्शी पुराव्यांचा अभाव असतानाही तांत्रिक तपासाचे आधारे पोलिसांनी केलेल्या तपासामुळे तालुक्यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम चव्हाण यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी केवळ ४८ तासांत दापोलीतील तिघांना अटक केली आहे. पैशाची चणचण असल्याने खून करुन चोरी केल्याची कबुली या तीनही आरोपींनी दिली आहे.

३१ आॅक्टोबर रोजी उन्हवरे -तोंडली मार्गावर राजाराम चव्हाण यांचा खून झाला होता. याप्रकरणी अभिजीत सुधाकर जाधव (२२, रा. गवे), नरेंद्र संतोष साळवी (२०, रा. बोंडीवली खोतवाडी), अक्षय विष्णू शिगवण (२०, रा. बोंडीवली थोरलाकोंड) या तीनही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

राजाराम चव्हाण यांच्याशी कोणतीही ओळख नसताना केवळ त्यांच्यावर पाळत ठेवत ३१ रोजी गाडी भाड्याने हवी असल्याचे खोटे कारण सांगून वेरळ येथून चव्हाण यांना उन्हवरे मार्गावर नेले. यावेळी चव्हाण यांच्याकडील ऐवजाची चोरी करताना झालेल्या झटापटीत चव्हाण हे जखमी झाले व प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तेथून पळ काढला. त्यांना जिवंत सोडल्यास ते पोलिसांना सर्व सांगून आपल्याला अडचणीत आणतील या भीतीने तिघांनीही त्यांचा पाठलाग करुन त्यांना ठार मारले. त्यानंतर मृतदेह उन्हवरे - तोंडली मार्गावरील पुलाच्या मोरीखाली टाकला.

राजाराम चव्हाण यांचे दोन्ही मोबाईल लांबवल्याने केवळ कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून खुन्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना अवघड होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, मंडणगडचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक संभाजी यादव, दापोलीचे पोलीस निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी खुनाचा छडा लावला.पैशांसाठी चोरीचा कट

खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांच्या हाती लागलेले नाही. हे तीनही तरुण पंचवीशीच्या आतील असून, अभिजीत वेल्डींगचे काम करतो तर नरेंद्र हा दापोलीतील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अक्षय कोणतेही शिक्षण घेत नसून, सध्या बेरोजगार आहे. पैशांसाठी चोरीचा कट रचल्याचे पुढे येत आहे.

टॅग्स :konkanकोकणMurderखून