शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:18 IST

corona virus Ratnagiri School- कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देखासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार

रत्नागिरी : कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. कोरोनामुळे नवीन निर्बंध जाहीर केले असून त्यामुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाकडूनही दि. ६ एप्रिलपासून सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळा मंगळवारपासून बंद राहणार आहेत. पुढील शासन आदेश येईपर्यत शाळांमधील अध्यापन बंद ठेवण्यात येणार असून, शिक्षक व कर्मचारी मात्र कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणार आहेत.राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र शाळांना जिल्हा प्रशासनाकडून काहीच आदेश प्राप्त न झाल्याने सोमवारी सर्वच शाळांमध्ये नियमितपणे वर्ग भरले होते. सर्वत्र आदेशाचीच चर्चा होती. अखेर शाळांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा बंदची सूचना देण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी अनेकांचे पेपर घेण्यात आले.बहुतांश शाळांच्या नववीच्या व अकरावीच्या परीक्षा सुरू असून, अंतिम टप्यात आहेत. दहावी व बारावीचे विद्यार्थी मात्र अभ्यासासाठी घरीच आहेत. पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर नववी व अकरावीच्या वर्गांबाबत काय करणार, असा प्रश्न होता. सोमवारी नववी व अकरावीचेही वर्ग बंद करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. गतवर्षी १५ मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तर यावर्षी दि. ६ एप्रिलपासून शाळा बंदचा करण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे शासन निर्णयानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या ३२०२ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीपर्यंतची सर्व मुले पास करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन केले जाणार आहे. नववी ते अकरावीचेही वर्ग पुढील शासन आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दहावी व बारावी परीक्षेबाबत बोर्डाकडून निर्णय जाहीर केले जाणार आहेत.- निशादेवी वाघमोडे,शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरी