शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Ratnagiri: देवडेच्या सुकन्येनेने मालदीवमध्ये केली ‘सुवर्ण’कामगिरी

By शोभना कांबळे | Updated: May 2, 2024 17:04 IST

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने मालदीव देशात झालेल्या ६ व्या एशियन कँरम ...

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिने मालदीव देशात झालेल्या ६ व्या एशियन कँरम चँम्पीयन २०२४ या आंतरराष्ट्रीय कँरम स्पर्धेत दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक अशा तीन पदकांची कमाई केली.या स्पर्धेचे यजमानपद हे मालदीव देशाला मिळाले होते. या स्पर्धेत भारतीय संघही सहभागी झाला होता. महिलांच्या चार जणींच्या चमूत देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा उदय कदम हिची संघात निवड झाली होती. विशेष म्हणजे या संघात महाराष्ट्रातून फक्त आकांक्षा ही एकमेव व वयाने सर्वात लहान असलेली खेळाडू सहभागी होती.आकांक्षाने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन सुवर्ण व एक ब्रांझ पदक अशी तीन पदकांची कमाई केली. आकांक्षा ही अगदी कमी वयात संपूर्ण देशभरात नावाजलेली खेळाडू असून आकांक्षाने यापूर्वीही उंच उंच शिखरे चढून यश प्राप्त केले आहे.आकांक्षाने २०१९ मध्येही मालदीव देशामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पदार्पणातच दोन सुवर्णपदके मिळवून विक्रम केला होता. राज्यस्तरावरील खुल्या गटाचे तब्बल नऊ वेळा तिला विजेतेपद व तीन वेळा उपविजेतेपद मिळाले आहे. एक हँटरिक आकांक्षाच्या नावे आहे. ज्युनिअर कॅरमचे सलग तीन वर्षे विजेतेपदही आकांक्षाच्या नावावर आहे.उत्तरप्रदेश वाराणसी येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेची आकांक्षा विजेती आहे राष्ट्रीय शालेय स्पर्धेत आकांक्षाला एक सुवर्ण तर दोन रौप्य पदके मिळाली आहेत.२०२२ मध्ये पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथे झालेल्या नॅशनल कॅरम स्पर्धेची आकांक्षा विजेती असून,आंध्रप्रदेशमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एक ब्रांझपदक व दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आकांक्षाला दोन कांस्यपदके मिळाली आहेत.तिला महाराष्ट्र कँरम असोसिएशनचे अरूण केदार, यतीन ठाकूर, भारती नारायण, रत्नागिरी कँरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, मामा आंतरराष्ट्रीय कँरमपटू संदिप देवरूखकर, महेश देवरूखकर व भाऊ यश कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी