शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 11:52 IST

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोकण कृषी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन युवावर्गामध्ये खेळभावना जागृत होण्याकरिता क्रीडा स्पर्धांचे आयोजन उपयुक्त : केसरकर

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आजपर्यं अनेक संशोधक या देशाला दिले आहेत. विविध नारळाच्या जाती, भाताच्या जाती, आंब्याच्या जाती तसेच विविध फळांच्या जातीचे संशोधन करुन नवनवीन फळांच्या जाती निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला जाते. या सर्व फळांच्या जातींचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक विद्यापीठात येत आहेत. विश्वातील इतर विद्यापीठानेही यासंशोधनाला मान्यता दिल्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे, असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.२१ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०१७ पर्यंत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे आयोजित केल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. युवावर्गामध्ये खेळभावना जागृत होण्याकरिता क्रीडा स्पर्धांचे आयोजन उपयुक्त ठरेल.

दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्याने राज्यातील होतकरु खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याकरिता संधी प्राप्त होते. शासनाने घेतलेल्या निर्णया अनुसार सर्व विभागात खेळाडूंना पाच टक्के विविध पदांच्या जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही केसरकर म्हणाले.कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, राज्याचे माजी राज्यपाल व विद्यापीठाचे तत्कालीन कुलपती पी.सी. अलेक्झांडर यांनी एड्स रोगाच्या प्रतिकार व जनजागृतीसाठी क्रीडा महोत्सवाची संकल्पना मांडली होती.

या क्रीडा महोत्सवाने गेल्या २० वषार्पासून महाविद्यालयीन युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. या स्पर्धांच्या आयोजनाच्या निमित्ताने युवकांमध्ये एड्स या रोगाविषयी जनजागृती करण्याची उत्तम संधी विद्यापीठाला मिळाली आहे, असेही खोत म्हणाले.या कार्यक्रमाला आमदार संजय कदम, डॉ. बाळासाहेबत सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य, राज्यपाल यांचे प्रतिनिधी दीपक माने, डॉ. सुभाष ढाणे, विनोद गायकवाड, दापोलीच्या नगराध्यक्ष उल्का जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिनव गोयल, क्रीडा महोत्सव संयोजक डॉ. सुभाष चव्हाण, प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeepak Kesarkarदीपक केसरकर