शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:13 IST

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर खेड येथे सुरू असलेले पत्रकारांचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण स्थगिततातडीने कारवाईचा लेखी आदेश

खेड : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर खेड येथे सुरू असलेले पत्रकारांचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.गेले पाच दिवस मटका माफियांविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील पत्रकारांसह जिल्ह्यातील पत्रकारांनी उपोषण सुरू केले होते. खेड शहरासह तालुक्यातील मटका व जुगार व्यवसायाविरुद्ध वृत्तपत्रात लिखाण केल्याचा राग मनात धरून खेड येतील पत्रकारांना मटका माफियांकडून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच दोन पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली होती.

संबंधित मटका माफियांवर तडीपारी बरोबरच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, या प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून बदली करण्यात यावी या मागणीसाठी पत्रकारांनी खेड प्रांत कार्यालयासमोर २० जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान या उपोषणाची गंभीर दखल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशन दरम्यान भेट घेऊन उपोषणकर्त्या पत्रकारांची मागणी निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनीदेखील तातडीने कारवाईची लेखी आदेश दिले. या आदेशाची प्रत युवा सेनेचे नेते योगेश कदम यांनी उपोषणकर्त्या पत्रकारांना दाखवली. उपोषणकर्त्या पत्रकारांनी या पत्राबाबत चर्चा करून सुरु असलेले उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.यावेळी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, युवानेते योगेश कदम यांच्या हस्ते उपोषणकर्ते पत्रकार अनुज जोशी, सिद्धेश परशेट्ये, अजित जाधव व दिवाकर प्रभू याना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी सतीश कदम, प्रमोद पेडणेकर, राकेश शिंदे, मकरंद भागवत, किशोर साळवी, देवेंद्र जाधव, मंदार आपटे, ज्ञानेश्वर रोकडे, चंद्रकांत बनकर, माजी नगरसेवक संजय मोदी,राजेश बुटाला, मिनार चिखले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी