शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत खड्डे पेटले, राजकीय रणकंदन सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 12:26 IST

माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली

रत्नागिरी : शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून बोलावलेली सभा उधळली गेल्यानंतर आता त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरही हा विषय वादाचा झाला असून, सामंत समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली आहे. कोणत्याही विषयावर बोलावलेली सभा होऊ न देणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या विषयात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगर परिषदेपर्यंत लाेकभावना पोहोचिवण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत सोशल मीडियावरून एकत्र येण्याची हाक देण्यात आली. रविवार, २८ रोजी दुपारी त्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. या सभेला शिंदेसेनेचे पदाधिकारीही पोहोचले. केवळ एकाच बाजूने आणि एकाच विषयावर चर्चा नको, अशी भूमिका मांडत या पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केलेल्या कामांची यादीच सभेत सादर केली. मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे आणि त्यापुढील रस्त्यांचेही काँक्रिटीकरण लवकरच होणार आहे. पाऊस कमी झाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी मांडली.मंत्री सामंत यांच्याविरोधात कोणी आकसाने सभा घेणार असेल, त्यांना विनाकारण लक्ष्य केले जाणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने पुढे सभा झालीच नाही.रविवारी संध्याकाळी हा विषय चांगलाच पसरला आणि सोशल मीडियावर त्यावरून वादावादी सुरू झाली. सामंत समर्थकांनी रत्नागिरीत झालेल्या कामांची उजळणी केली, तर विरोधकांनी सभा होऊ दिली नाही, यावरून जोरदार टीका सुरू केली आहे. दोन्ही बाजूने यावर जाेरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी