शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्याच्या झुंजीनंतर संतोष देवरूखकर यांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:22 IST

corona virus, accident, ratnagirinews मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.

ठळक मुद्देमुंबईकडे निघालेली रुग्णवाहिकेने धरला कोविड सेंटरचा मार्ग दापोलीतील डॉक्टरांकडून उपचार

शिवाजी गोरेदापोली : मुंबईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेने अचानक दापोली कोविड सेंटरकडे वळण घेतले आणि जीव भांड्यात पडला. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि आपण संपलो, असा विचार मनात येऊन गेला. परंतु, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल एक महिन्याच्या यशस्वी झुंजीनंतर आपण कोरोनावर मात केली आहे, असे भावनिक उद्गार आहेत कोरोनावर मात केलेल्या संतोष देवरुखकर यांचे.अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संतोष देवरुखकर यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आपले नक्कीच काहीतरी बरेवाईट होणार, असा विचार मनामध्ये येऊ लागला. नातेवाईकांनी त्यांना मुंबईला नेण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु, अचानक मुंबईला जाण्याचा बेत बदलला आणि रुग्णवाहिकेने थेट कोविड सेंटरचा रस्ता धरला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९२ टक्के फुफ्फुस निकामी झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्याही परिस्थितीत नातेवाईकांनी आपल्याला दापोलीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.परंतु, नीलेश शेठ यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्याचा सल्ला दिला. तसेच डॉ. महेश भागवत, डॉ. सुयोग भागवत यांच्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला. उपचाराकरिता दाखल झाल्यावर पहिले काही दिवस खूप तणावाखाली होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांनी उपचार सुरु केले. रुग्णालयातील डॉक्टरांवर विश्वास ठेवल्यानेच आजारातून बाहेर आल्याचे देवरुखकर म्हणाले.

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर मध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. शासनाकडून इंजेक्शन, औषध, उपलब्ध करून दिले आहेत. फिजिशियन असून, सर्व सहकाऱ्यांच्या जोरावर मृत्यू दर घटविण्यात यश मिळवले आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.- डॉ. महेश भागवत, अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालयात, दापोली

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये समाधानकारक काम होत आहे. दापोलीत सेंटर झाल्याने लोकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. पुणे, मुंबईकडे जाणारे रुग्ण दापोलीत उपचार घेत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.- नीलेश सेठ, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी