शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

सेना, राष्ट्रवादी शहरप्रमुखांचे अर्ज बाद

By admin | Updated: October 9, 2015 22:11 IST

मंडणगड नगरपंचायत : २४ नामनिर्देशनपत्र छाननीत बाद; ६० उमेदवार रिंगणात

मंडणगड : नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद जाधव आणि राष्ट्रवादीचे शहरप्रमुख वैभव कोकाटे यांची नामनिर्देशनपत्रे छाननीत बाद झाली आहेत. ८४ पैकी २४ नामनिर्देशनपत्र छाननीत बाद झाल्याने ६० उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग १ मधून बेबी गोरे (राष्ट्रवादी) अश्विनी बकरे (भाजप), शुभदा सापटे (राष्ट्रवादी) नम्रता पिंपळे (सेना) यांचे अर्ज वैध, तर वर्षा नगरकर (सेना) यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग २ आरती तलार (राष्ट्रवादी), वर्षा नगरकर (सेना), काजल लोखंडे (भाजप) यांचे अर्ज वैध, तर राजेश्री तलार (सेना) यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग ३ शांताराम भेकत (राष्ट्रवादी), विश्वदास लोखंडे (भाजप), राजेंद्र गोरिवले (सेना), यांचे अर्ज वैध. वसंत गोरिवले (राष्ट्रवादी), जयेश नगरकर (सेना) यांचे अर्ज अवैध. प्रभाग ४ अनिल महाजन (भाजप), जितेंद्र सापटे (सेना), सुभाष सापटे (राष्ट्रवादी) यांचे अर्ज वैध ठरले, तर महेंद्र सापटे (सेना), नरेश बैकर (राष्ट्रवादी) यांचे अर्ज अवैध ठरले. प्रभाग ५ भक्ती वाईकर (भाजप) श्रुती साळवी (राष्ट्रवादी), शीतल गोरिवले (सेना) यांचे अर्ज वैध, वैशाली पवार (सेना), दर्शना गोरिवले (राष्ट्रवादी) यांचे अर्ज अवैध. प्रभाग ६ उदय गुजर (सेना), शशिकांत परकर (भाजप), सचिन बेर्डे (राष्ट्रवादी) यांचे अर्ज वैध, सिध्देश गुजर (सेना) यांचा अर्ज अवैध. प्रभाग ७ आदेश मर्चंडे, मोहंमद सालीम, सलाम मुकादम, संजय राणे (सर्व अपक्ष), विनोद जाधव (सेना) नवज्योतसिंग गौड (मनसे), श्रीकांत जगदाळे (भाजप) यांचे अर्ज वैध, तर सुहेब चौगले (सेना) यांचा अर्ज अवैध. प्रभाग ८ अनंत बकरे (भाजप), बबन लेंडे (सेना), संजय राणे (अपक्ष), दिनेश लेंडे (राष्ट्रवादी), यांचे अर्ज वैध, तर विनोद जाधव (सेना), दत्तात्रय लेंडे (राष्ट्रवादी) यांचे अर्ज अवैध. प्रभाग ९ मधून श्वेता सापटे (राष्ट्रवादी), स्वप्नाली दुर्गवले (भाजप), दक्षता सापटे (सेना) यांचे अर्ज वैध, रजनी पिचुर्ले (राष्ट्रवादी), गुलाब कुलापकर (सेना) यांचे अर्ज अवैध. प्रभाग १० अस्मिता सोमण (भाजप), रेश्मा मर्चंडे (अपक्ष), श्रध्दा लेंडे (काँग्रेस), सुषमा राणे (सेना) यांचे अर्ज वैध, नम्रता पिंपळे (सेना) यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग ११ मधून राजेश मर्चंडे, हरेश मर्चंडे यांचे अर्ज वैध, तर संजय रेड्डी (सेना) यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग १२मधून पूर्वी यादव (अपक्ष), स्नेहल मांढरे (काँग्रेस), नम्रता पिंपळे यांचे अर्ज वैध ठरले. प्रभाग १३ अनुराग कोंळबेकर (भाजप) कमलेश शिगवण (राष्ट्रवादी), सुधीर हातमकर (सेना), चंद्रकांत पंदीरकर (मनसे) यांचे अर्ज वैध, वैभव कोकाटे (राष्ट्रवादी), प्रवीण जाधव (सेना) यांचे अर्ज अवैध. प्रभाग १४ अनुराग कोळंबेकर (भाजप), राहुल कोकाटे (काँग्रेस), दत्तप्रसाद गांगण (मनसे), सुधीर तांबीटकर (सेना) यांचे अर्ज वैध, यशपाल बोलाडे (सेना) यांचा अर्ज अवैध ठरला. प्रभाग १५ अक्षता कोळंबेकर (भाजप), प्रमिला कामेरीकर (सेना), नेत्रा शेरे राष्ट्रवादी यांचे अर्ज वैध, रेखा पवार (राष्ट्रवादी) पूर्वा जाधव (सेना) यांचे अर्ज अवैध ठरले. प्रभाग १६ मनिषा अधिकारी (भाजप), वैशाली रेगे (काँग्रेस), सीमा धामणस्कर (सेना) यांचे अर्ज वैध, विमल कामेरीकर (सेना) यांचा अर्ज अवैध. प्रभाग १७ प्रियांका शिगवण (राष्ट्रवादी), सेजल गोवळे (सेना), स्वप्नाली दुर्गवले (भाजप) यांचे अर्ज अवैध. नमिता शिगवण (राष्ट्रवादी), शीतल गोरिवले (सेना) यांचे अर्ज अवैध ठरले. (प्रतिनिधी)रत्नागिरीत २४ उमेदवारी अर्ज वैधरत्नागिरी : रत्नागिरी पालिका पोटनिवडणुकीत शुक्रवारच्या छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले. मात्र, आज (शुक्रवार) २४ पैकी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात आता १९ उमेदवार उरले आहेत. निवडणूक विभागाच्या सुत्रांनी ही माहिती दिली. रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व ४मधील प्रत्येकी दोन जागा राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले चार नगरसेवक अपात्र ठरल्याने रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी या निवडणुकीसाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर मनसेनेही दोन अर्ज दाखल केले आहेत. डमी उमेदवारांमुळे अर्जांची संख्या २४वर पोहोचली होती. मात्र, आज दुपारी राष्ट्रवादीच्या डमी उमेदवारांनी आपली दुसऱ्या प्रभागातून भरलेली उमेदवारी मागे घेत एका प्रभागातील उमेदवारी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीच्या श्वेता सुभाष शेट्ये व शिल्पा राहुल सुर्वे यांनी प्रभाग २ ब मधून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग २ ड मधून राष्ट्रवादीच्या कौसल्या केतन शेट्ये यांनी, तर प्रभाग ४ ड मधून अफशान मुर्तुझा व मुनव्वर मालवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली. अन्य पक्षांच्या उमेदवारांनी भरलेले डमी अर्ज अद्याप मागे घेतलेले नाहीत. रत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार पक्षनिहाय याप्रमाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस - उमेश शेट्ये, कौसल्या शेट्ये, शिल्पा सुर्वे, रुबीना मालवणकर. शिवसेना - ऋतुजा देसाई, पूर्वा सुर्वे, दिशा साळवी, तन्वीर जमादार. भाजप -सुहासिनी भोळे, नीलिमा शेलार, मनोज पाटणकर, निशा आलीम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना-सचिन शिंदे, रचना आंबेलकर. अपक्ष - आशिष केळकर. (प्रतिनिधी)उमेदवारांची रदबदली होणार?शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी चार, तर मनसे २ व अपक्ष आशिष केळकर असे एकूण १५ उमेदवार आहेत. १९ मधील ४ डमी उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांची अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत रदबदली होणार असल्याची चर्चा आहे.